नागपूर शहर: काही सेकंदाने वाचले जीव, अवाढव्य झाड कोसळले,थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद
अंबाझरी लेक रोडवरील घाटे रेस्टॉरंटजवळ आज दुपारी एक अवाढव्य झाड अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. या घटनेमुळे स्थानिक प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणावर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित झाड अत्यंत धोकादायक स्थितीत असून ते कधीही कोसळू शकते, अशी भीती नागरिकांनी आधीच व्यक्त केली होती.