औंढा नागनाथ: येहळेगाव सो-निशाणा मार्गावरील मधोमती नदी पूलाची शेतकऱ्यांने स्वखर्चाने केली दुरुस्ती;शेतकऱ्याचे सर्वत्र कौतुक
यावर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने शेती पिकासह रहदारीच्या रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे या दरम्यान आलेल्या पुरात औंढा नागनाथ तालुक्यातील येहळेगाव सोळंके ते निशाणा जाणाऱ्या रस्त्यातील मधोमती नदीवरील पूल खचला होता त्यामुळे या भागातील रहदारीस मोठा निर्माण झाला. याबाबत प्रशासनास माहिती देत निवेदन दिले परंतु दुरुस्ती झाली नसल्याने तरुण शेतकरी शुभम पाटील सोळंके या शेतकऱ्याने दिनांक १० ऑक्टोबर शुक्रवारी दुपारी तीन वाजता स्वखर्चातून नदीवरील पुलाची दुरुस्ती केली