तिरोडा: युवक राष्ट्रवादी काँग्रेसने उपविभागीय अधिकारी कार्यालय,तहसील कार्यालय व कृषी अधिकारी कार्यालयात दिले निवेदन
Tirora, Gondia | Oct 17, 2025 तिरोडा तालुक्यात अलीकडेच झालेल्या मावा तुडतुळा रोगाच्या तीव्र प्रभावामुळे शेतकऱ्यांच्या धान पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या या संकटाची दखल घेत तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तिरोडा तालुकाध्यक्ष खुमेंद्र(विक्की) रहांगडाले यांच्या प्रमुख उपस्थितीत माननीय तहसीलदार ठाकरे साहेब , उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड मॅडम तसेच तालुका कृषी अधिकारी गेडाम साहेब यांना निवेदन देण्यात आले.