फलटण: आगामी विधानसभा निवडणूकीत बौध्द समाजाला आमदारकीचे तिकिट मिळावे; खासदार शरद पवार यांच्याकडे फलटण संविधान समितीची मागणी
Phaltan, Satara | Sep 11, 2024 फलटण कोरेगांव विधानसभा मतदार संघात एकच निर्धार बौध्द आमदार असा निश्चय करीत आगामी निवडणूकीमध्ये आमदारकीचे तिकिट मिळावे म्हणून फलटण संविधान समिती यांच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खा. शरदराव पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.बुधवार दि.११ सप्टेंबर 2024 रोजी दुपारी १ वाजता बारामती येथील निवासस्थानी संविधान समिती पदाधिकारी यांनी खा. शरदराव पवार यांची भेट घेतली.१५ वर्षे फलटण कोरेगांव विधानसभा मतदार संघात आरक्षण असताना कोणत्याही पक्षाने उमेदवारी दिली नाही.