उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार नागपूर ग्रामीण पोलिसांनी चायनीज मांजावर पूर्णतः बंदी घातली आहे. मकरसंक्रांतीच्या काळात होणारे अपघात आणि पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी कडक दंडात्मक कारवाईची घोषणा करण्यात आली आहे. नायलॉन मांजाने पतंग उडवताना आढळल्यास २५,००० रुपये दंड आकारला जाईल. मुलगा अल्पवयीन असल्यास हा दंड पालकांकडून वसूल केला जाईल.