नागपूर शहर: “हे प्रेम दादांवरच!” सुनेत्रा पवारांचे नागपुरात जंगी स्वागत; सुप्रिया सुळेंच्या ‘त्या’ भूमिकेला दर्शवला पाठिंबा
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या पहिल्यांदाच नागपूर दौऱ्यावर आल्या आहेत. नागपूर विमानतळावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे अत्यंत उत्साहात आणि जंगी स्वागत केले. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी विविध राजकीय आणि कौटुंबिक विषयांवर आपली मते मांडली.