आगामी मकर संक्रांतीच्या सणाचे औचित्य साधून व त्या अनुषंगाने होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा पोलीस प्रशासनाने नायलॉन व चायनीज मांजाच्या खरेदी - विक्रीस बंदी घातली आहे. पक्ष्यांच्या व नागरिकांच्या सुरक्षेतेसाठी नायलॉन मांजा वापरू नये, असे आवाहन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले आहे.