नागपूर शहर: अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या प्रकरणात २१ वर्षीय आरोपी मुंबईतून जेरबंद : अनिल ताकसांडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
जरी पटका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल ताकसांडे यांनी 30 जुलैला दुपारी 5 वाजता दिलेल्या माहितीनुसारअल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली जरीपटका पोलिसांनी २१ वर्षीय आरोपीला मुंबईतून अटक केली आहे.ईटभट्टीवर काम करण्यासाठी आलेल्या मध्य प्रदेशमधील कामगारांच्या गटातील दीपक नावाच्या २१ वर्षीय तरुणाने १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता. जरीपटका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच आरोपी तिथून फरार झाला होता.