अलिबाग: अलिबाग-फुफादेवी पाडा येथे दरड कोसळली
Alibag, Raigad | Jun 27, 2026 अलिबाग तालुक्यातील फुफादेवी पाडा परिसरात दरड कोसळल्याची घटना घडली. या दरडीसह आलेला भला मोठा दगड थेट एका घराच्या कंपाऊंडमध्ये येऊन पडल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठी दुर्घटना थोडक्यात टळल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. चंद्रकांत पाटील हे फुफादेवी येथे राहतात. गुरुवारी (२५ जून) सकाळी उठल्यानंतर त्यांना दरड कोसळल्याचे लक्षात आले. घटनेची माहिती मिळताच रायगड जिल्हा परिषद सदस्य अमित नाईक यांनी घटनास्थळी भेट देत सदर कुटुंबियांना धीर देण्याचा प्रयत्न केला.