क्षयरोगमुक्त जिल्ह्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत महानगर गॅस लिमिटेडने मुंबई यांनी आपल्या सामाजिक बांधिलकीतून 550 क्षयरुग्णांना 3 हजार 300 पोषक आहार फूड बास्केटचे वितरण मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या हस्ते जिल्हा परिषद, अलिबाग येथे करण्यात आले. जिल्हाधिकारी किशन जावळे व मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी कॉर्पोरेट क्षेत्रातील कंपन्याना निक्षय मित्र बनवून त्यांना फूड बास्केट वाटप देण्यासाठीचे अहवान केले होते त्यास प्रतिसाद देत महानगर गॅस लिमिटेड मुंबईने ही कार्यवाही केली.