नागपूर शहर: 'तुम तो ठहरे परदेसी' फेम गीतकार झहीर आलम यांचे नागपुरात निधन
नव्वदच्या दशकात तुफान गाजलेल्या 'तुम तो ठहरे परदेसी' या गाण्याचे गीतकार **झहीर आलम** यांचे रविवारी रात्री साडेअकरा ते बाराच्या दरम्यान दीर्घ आजाराने निधन झाले. ते नागपूरच्या मोमीनपुरा भागातील रहिवासी होते. अल्ताफ राजा यांनी गायलेले 'तुम तो ठहरे परदेसी' हे गाणे झहीर आलम यांनीच लिहिले होते. या एका गाण्याने त्यांना घराघरात पोहोचवले.सुरुवातीला एम्प्रेस मिलमध्ये नोकरी करणाऱ्या आलम यांना मिल बंद पडल्यानंतर अत्यंत गरिबीचा सामना करावा लागला.