जालना: नागेवाडी टोलनाक्यावर 1 हजार 500 किलो गोमांस, कुजलेले मुंडके व हाडे जप्त; चंदनझीरा पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
Jalna, Jalna | Sep 29, 2026 जालना शहरातील नागेवाडी टोलनाका परिसरात वाहन तपासणीदरम्यान पिकअप वाहनातून विनापरवाना जनावरांचे मांस, मुंडके व हाडे वाहतूक करताना आढळून आल्याने चंदनझिरा पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत सुमारे 1 हजार 500 किलो गोमांस, जनावरांचे कुजलेले मुंडके, मांस व हाडे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मंगळवार दि. 29 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी दोघांविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.