लातूर: मसलगा प्रकल्प धोकादायक प्रकल्पच्या पाळुवरच छावा संघटनेचे दुरुस्तीसाठी आमरण उपोषण सुरु
Latur, Latur | Oct 8, 2025 लातूर -मसलगा प्रकल्पाच्या पाळुला पडलेल्या भेगांमुळे संपूर्ण प्रकल्पच धोकादायक अवस्थेत आला असून तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी वेगाने जोर धरत आहे. या गंभीर दुर्लक्षाविरोधात छावा संघटनेचे तालुकाध्यक्ष तुळशीदास साळुंके यांनी तळ्याच्या पाळुवरच आमरण उपोषणाला सुरुवात केली असल्याचे आज दिनांक 8 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीन वाजता पाहायला मिळाले.