नागपूर शहर: नंदनवन हद्दीत 12 वर्षीय चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला कारावास
शाळेतून घरी जाणाऱ्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलाचा पाठलाग करून त्याच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला नागपूर न्यायालयाने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. निलेश रामभाऊ देशकर (वय ३५ वर्ष, रा. दिघोरी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. ११ ऑक्टोबर २०२३ रोजी नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली होती. पीडित मुलाच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली होती.