फलटण: डॉ. संपदा मुंडेंना न्याय मिळावा म्हणून फलटण शहर पोलीस ठाण्यात जाणार : शिवसेना उबाठा नेत्या सुषमा अंधारे यांची माहिती
फलटण येथील डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाला न्याय मिळावा या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या व प्रवक्त्या डॉ. सुषमा अंधारे यांनी रविवारी दुपारी तीन वाजता सांगितले की, त्या फलटण पोलीस ठाण्यात जाणार आहेत. या माध्यमातून पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी ठोस भूमिका घेणार आहेत. या प्रकरणात संबंधित आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, तपास पारदर्शक व्हावा आणि महिला सुरक्षेचा प्रश्न केवळ आश्वासनांपुरता राहू नये, यासाठी फलटणमध्ये जाणार असल्याचे निदर्शनास आणून दिले.