बोराळा व धनेगाव परिसरातील शेतशिवारात बिबट्या दिसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.मात्र ही माहिती पूर्णतः अफवा असल्याचे स्पष्ट झाले असून, नागरिकांनी कोणत्याही प्रकारची घबराट पसरवू नये,असे आवाहन करण्यात येत आहे. दिनांक २९ डिसें रोजी सकाळी सुमारे ७ वाजताच्या सुमारास बोराळा–धनेगाव शेतशिवार, टाकोनकारी परिसर तसेच अंजनगाव रोडलगत असलेल्या नाल्याच्या परिसरात शेतात शेतकरी ओलीत करायला गेले असता त्यांना गव्हात बिबट्या फिरत