हिंगोली: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची पिंपळदरी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेस अचानक भेट
हिंगोली जिल्ह्याच्या औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेला जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिनांक 28 नोव्हेंबर शुक्रवार रोजी दुपारी एक वाजे दरम्यान अचानक भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांची गुणवत्ता शैक्षणिक प्रगतीची माहिती घेतली व शालेय उपक्रम, मूलभूत सुविधा, डिजिटल शिक्षण साधनाचा वापर, शाळेतील स्वच्छता याची पाहणी केली तसेच शिक्षकांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी सुचनाही दिल्या .यावेळी शिक्षक विद्यार्थी ग्रामस्थ यांची उपस्थिती होती