नागपूर शहर: रामदासपेठेत थरार: कौटुंबिक वादातून युवक पाचव्या मजल्याच्या छज्जावर लटकला; अग्निशमन दलाने वाचवले प्राण
रामदासपेठ परिसरात रविवारी सायंकाळी 6 च्या सुमारास एका मद्यधुंद युवकाच्या हायव्होल्टेज ड्रामामुळे मोठी खळबळ उडाली. पत्नीसोबत असलेल्या वादातून या युवकाने टोकाचे पाऊल उचलले होते, मात्र सुदैवाने अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे त्याचे प्राण वाचले.आकाश नामक युवकाचा आपल्या पत्नीसोबत गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. रविवारी तो नशेत आपल्या सासरी पोहोचला, जिथे पुन्हा वाद झाल्याने त्याने संतापाच्या भरात शेजारील इमारतीचे छत गाठले.