नाशिक: कॅन्टोन्मेंट बोर्ड येथील सार्वजनिक वाचनालयाच्या स्पर्धा परीक्षेला आलेल्या विद्यार्थ्यांच्या दुचाकीने घेतला अचानक पेट
Nashik, Nashik | Sep 18, 2025 देवळाली कॅम्प,कॅन्टोन्मेंट बोर्ड सार्वजनिक वाचनालयाच्या येथे स्पर्धा परीक्षेला आलेल्या विद्यार्थ्यांच्या दुचाकीने अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.साकुर फाटा तालुका इगतपुरी येथून आलेल्या सुरज शहाणे याने त्याची दुचाकी कॅन्टोन्मेंट बोर्ड सार्वजनिक वाचनालयाच्या पार्किंगमध्ये उभी केलेली असताना अचानक पेटली.आगीचा धुराळा पाहून तेथील बघणाऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला.अग्निशामक दलाला कळविले असता अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन आग आटोक्यात आणली.