कल्याण: फडके रोड येथील दिवाळी पहाट कार्यक्रमात कमळी मालिकेतील अभिनेत्रीच्या शिवस्तुतीने वेधले सर्वांचे लक्ष
Kalyan, Thane | Oct 20, 2025 डोंबिवलीच्या फडके रोड येथे मोठ्या उत्साहात दिवाळी पहाट कार्यक्रम साजरा करण्यात आला. तरुणाईने वेगवेगळ्या वेशभूषा परिधान करून मोठ्या संख्येने हजेरी लावून दिवाळी पहाट कार्यक्रमाचा आनंद घेतला. या दिवाळी पहाट कार्यक्रमात राजकीय नेते,कलाकारांनी देखील उपस्थिती लावली होती. दिवाळी पहाट कार्यक्रमांमध्ये कमळी मालिकेतील मुख्य भूमिका बजावणाऱ्या अभिनेत्री विजया बाबरच्या शिवस्तुतीने सर्वांचे लक्ष वेधले. सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत टाळ्या वाजवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.