नागपूर शहर: प्रशासकीय बैठका आता ऑनलाईनच; 'स्वदेशी' आणि 'बचती'वर भर - पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना प्रशासकीय कामात मोठे बदल करण्याचे संकेत दिले. जिल्हाधिकारी आणि इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांना वारंवार प्रत्यक्ष बैठकीसाठी न बोलावता, तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाईन संवाद साधण्यावर भर दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.