खालापूर: खालापूर येथे ऑल इंडिया पँथर सेनेची बैठक राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांच्या उपस्थितीत संपन्न
आज गुरुवार दिनांक १६ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ च्या सुमारास रायगड जिल्ह्यातील खालापूर येथे ऑल इंडिया पँथर सेनेची बैठक ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक केदार यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी जिल्हा, तालुका कार्यकारिणीचे गठण करण्यात आले. जिल्हा प्रभारी नरेश गायकवाड, जिल्हा अध्यक्ष उत्तर मंगेश सावंत यांच्या नेतृत्वात नियुक्ती करण्यात आली.