सेलू: तालूक्यातील अनेक गावातील शिवारात बिबट्या चा वावर असल्याचे व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल होत असल्याने शेतक-यात बिबट्याची भिती कायम आहे तर सोमवार १५ रोजीच्या सकाळी ५ वाजता हातनूर शिवारातील सोनाजी डूकरे यांच्या शेतात बांधलेल्या गायीवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली. शेजारील शेतक-यांनी आरडाओरड केल्याने तेथून बिबट्या पळ काढला. तर सकाळी ११:३० वाजेच्या सूमारास साळेगाव येथील रामेश्वर गायके यांच्या शेतात बिबट्या आढळून आल्याचा चर्चा आहे.