नागपूर शहर: भाजपचा अपप्रचार आणि तपास यंत्रणांचा धाक राहुल गांधींना रोखू शकला नाही; विकास ठाकरे यांचा घणाघात
देशातील विरोधी पक्षनेता कसा असावा, याचा आदर्श राहुल गांधी यांनी आपल्या कार्यातून घालून दिला आहे, अशा शब्दांत काँग्रेस आमदार विकास ठाकरे यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वाचे कौतुक केले. भाजपने त्यांना बदनाम करण्यासाठी आणि त्यांचा झंजावात रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, मात्र त्यात त्यांना अपयश आल्याचा दावाही ठाकरे यांनी केला आहे.