समुद्रपूर: शेतीच्या वादातून शेतकऱ्यांवर छर्याच्या बंदुकीतून मारा: दोन भाऊ जखमी:आरंभा शिवारातील घटना
समुद्रपूर: शेतीच्या धुर्यावरील जेसीबीच्या सहाय्याने झाडे काढीत असताना शेजारच्या शेतकऱ्यांने अडवणूक करीत वाद करीत दोघांवर छर्या च्या बंदुकीतून छरे मारल्याने दोघे जखमी झाल्याची घटना आरंभा शिवारात घडली आहे.प्राप्त माहितीनुसार आरंभा शिवारात विनायक मधुकर कुकडे व अमित मधुकर कुकडे दोघेही जेसीबी च्या सहाय्याने धुर्या वरील झाडे काढीत असताना शेजारचे शेतकरी प्रविण महाजन व पिंटू महाजन यांनी सदर झाडे काढण्यास मनाई करीत त्या ठिकाणी वाद निर्माण झाला.