समुद्रपूर: फरीदपूर येथे पार पडला महिला मेळावा, महिलांना विविध विषयांवर करण्यात आले मार्गदर्शन
फरिदपूर येथे मिशन समृद्धी, पौर्णिमा ग्रामसंघ व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक किशोर जगताप यांनी जागतिक महिला दिनाची सुरुवात, सक्षमिकरण, पुरुषत्ताक संस्कृती, संविधान, महिलांचे कायदे, महिलांचे नेतृत्व, महिलांचा सर्वांगीण विकास, रूढी-परंपरा इत्यादी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.कार्यक्रमात संगीत खुर्ची, बटाटा खेळ व फुगा खेळ घेऊन प्रथम, द्वितीय व तृतीय बक्षिसे देण्यात आली.