समुद्रपूर: शहरातील वार्ड क्रमांक ११ मध्ये पुन्हा एकदा भर दिवसा घरफोडी:नगदीसह ३० हजार रुपये किमतीचे ऐवज लंपास
समुद्रपुर शहरातील वार्ड क्रमांक ११ मध्ये पुन्हा एकदा चोरट्यांनी भरदिवसा चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. शहरातील वार्ड क्रमांक ११ मधिल रहिवासी राजु मडावी याचे घरी कुणीच नसतांना घरी असलेले नगदी तिस हजार रु असा ऐवज चोरट्यांनी नेला तेथील नागरीकानी घटनेची माहिती समुद्रपूर पोलिस स्टेशनला दिली असता ठाणेदार रविद्र रेवतकर, याचे मार्गदर्शनात पोलिस उपनिरिक्षक टेभूर्णे पोलिस कर्मचारी आलोक हनुमंते यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करीत पंचनामा केली व अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.