औंढा नागनाथ: तुळजापूर पीठ म्हणून प्रसिद्ध दरेगाव रोड लगत कनकेश्वरी देवी मंदिर येथे असंख्य भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ
औंढा नागनाथ येथील दरेगाव रोड लगत असलेल्या कणकेश्वरी देवीचे मंदिर हे तुळजापूर येथील तुळजाभवानीचे पीठ म्हणून प्रसिद्ध आहे या ठिकाणी दिनांक ६ ऑक्टोबर सोमवार रोजी दुपारी साडेबारा वाजल्यापासून नवरात्र उत्सवानिमित्त महाप्रसादाचे आयोजन देवी मंदिर सेवा समितीच्या वतीने करण्यात आले होते यामध्ये असंख्य भाविकांनी दर्शनासह महाप्रसादाचा लाभ घेतला. दुपारी साडेबारा वाजल्यापासून सुरू झालेल्या महाप्रसादाचा सायंकाळी पाच वाजेपर्यंत असंख्य भाविकांनी लाभ घेतला