खालापूर: खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांचे बोनस साठी आंदोलन
आमदार महेंद्र थोरवे यांनी मुख्याधिकारी यांची केली कान उघडणी
खोपोली नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान म्हणजे दिवाळी बोनस देण्याचे निश्चित झाले असताना दिवाळी उजाडली तरी प्रशासना कडून कोणतीच तजवीज न झाल्याने आज सकाळी सात वाजल्या पासून सर्व कर्मचारी आत्यावश्यक सेवा फक्त सुरु ठेऊन संपवर गेले. आमदार माहेंद्र थोरवे यांच्या विषय कानी गेल्यानंतर त्यांनी मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांना दूरध्वनी करून चांगलेच सुनावले व कर्मचाऱ्यांना तात्काळ बोनस देण्याचे आदेश दिले.