नागपूर शहर: मेयो हॉस्पिटलजवळील कापडाच्या दुकानावरून वाद; महिलेवर चाकूने जीवघेणा हल्ला, आरोपी अटकेत
29 एप्रिलला दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार नागपूर शहरातील तहसील पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मेयो हॉस्पिटल परिसरात कापडाचे दुकान लावण्यावरून झालेल्या वादातून एका महिलेवर चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेत कौशल्या वामन भीशीकर या गंभीर जखमी झाल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी मनोज छोटेलाल समुद्रे याला अटक केली आहे.