नागपूर शहर: मरियम अम्मा दर्गा प्रकरणात महिलेवर अत्याचार प्रकरणी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची पहिली प्रतिक्रिया आली समोर
कोलकात्यातील एका महिलेने जुनी कामठीतील 'हुजूर मरियम अम्मा दर्गा' येथील बाबा आणि त्यांच्या साथीदारांवर गंभीर आरोप केले आहेत. महिलेच्या तक्रारीनुसार, एप्रिल महिन्यात तिला दर्गा परिसरात डांबून ठेवले, धर्मांतरासाठी दबाव टाकला आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी मुख्य प्रशासकासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहेत.