नागपूर शहर: सावधान! शॅम्पूच्या बाटलीत ड्रग्ज; DRI कडून नागपुरात ४.२६ कोटींचा मुद्देमाल जप्त.
महसूल गुप्तचर संचालनालयाने नागपुरात एक मोठी कारवाई करत आंतरराज्य ड्रग्ज तस्करीचे रॅकेट उद्ध्वस्त केले आहे. दिल्ली-बेंगळुरू राजधानी एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या एका भारतीय महिलेकडून ८५३ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले असून, आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत सुमारे ४.२६ कोटी रुपये आहे. DRI च्या नागपूर युनिटला मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून ही कारवाई करण्यात आली.आरोपी महिलेने ड्रग्ज लपवण्यासाठी शॅम्पूच्या बाटल्यांचा वापर केला होता.