नागपूर शहर: अंबाझरी तलावाच्या संवर्धनासाठी लोकसहभागावर भर; जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून परिसराची पाहणी
नागपूरचे ऐतिहासिक वैभव असलेल्या अंबाझरी तलाव क्षेत्रातील जैवविविधता जपण्यासाठी आणि या परिसराच्या संवर्धनासाठी प्रशासनाने आता कंबर कसली आहे. या परिसरातील पर्यावरण सुरक्षित ठेवण्यासाठी इच्छुक तरुण आणि विविध स्वयंसेवी संस्थांशी समन्वय साधण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज प्रत्यक्ष अंबाझरी परिसराची पाहणी केली.