रावेर: अंजाळे येथे वृद्धास मुलाची शिवीगाळ, समजवण्यात आलेल्या दांपत्याला दोघांची मारहाण,यावल पोलिसात तक्रार
Raver, Jalgaon | Sep 21, 2025 अंजाळे या गावात हरी बादशहा हे वृद्ध राहतात. त्यांचा मुलगा त्यांना शिवीगाळ करत होता. तेव्हा समजवण्यास आलेल्या सागर बादशहा व त्याची पत्नी शितल बादशहा या दोघांना चंदू बादशहा वंदना बादशाह या दोघांनी शिवीगाळ करून मारहाण केली आणि ठार मारून टाकण्याची धमकी दिली. तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात हरी बादशाह यांनी चंदू बादशाह व वंदना बादशाह यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवली आहे.