नागपूर शहर: नागपुरात संतापजनक घटना: १० वर्षांच्या चिमुरड्यावर ६० वर्षीय नराधमाचा अनैसर्गिक अत्याचार ; नंदनवन पोलिसांकडून आरोपीला अटक
उपराजधानीतील नंदनवन पोलीस स्टेशन अंतर्गत एका १० वर्षीय निष्पाप मुलावर ६० वर्षीय वृद्धाने अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलाची आई नंदनवन परिसरात आपल्या पतीच्या निधनानंतर माहेरी राहते. उदरनिर्वाहासाठी ती एका नाश्त्याच्या दुकानात काम करते. २९ एप्रिल रोजी दुपारी मुलगा घरात एकटाच होता.