भडगाव: गुढे नावरे पुलाखालील नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असतानाच पुलाखाली लागली अचानक आग,
भडगाव तालुक्यातून वाहणाऱ्या गिरणा नदीला मोठ्या प्रमाणात महापूर आला असून या गिरणा नदीवरील सर्वच पुलांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे, काही पुलांच्या वरून देखील पाणी वाहत आहे, तर गुढे नावरे पुलाखालील नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाहत आहे यातच या वाहत्या पाण्यासोबत आलेला काळी, कचरा, चारा, लाकडी ओंढके हे अडकल्याने पाणी वाहण्यास मोठ्या अडथळा होत असतानाच अचानक या अडकलेल्या सर्व चाऱ्यास आज दिनांक 28 सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास आग लागलेली दिसून आली,