तलासरी: ग्रामीण डोंगराळ एकात्मिक वैद्यकीय सेवा संघटनेमार्फत पालघर तालुक्यातल्या सावरे शाळेत शैक्षणिक साहित्याचं वाटप.
ग्रामीण व डोंगराळ विभाग एकात्मिक वैद्यकीय सेवा संघटने मार्फत पालघर तालुक्यातील सावरे या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप करून विद्यार्थ्यांसोबत आरोग्य बबत संवाद साधला आहे. या वैद्यकीय क्षेत्रात ग्रामीण भागात काम करणाऱ्या वैदु म्हणून सेवा करणाऱ्या या डॉक्टर मंडळीने शैक्षणिक साहित्य वाटून समाजाप्रती एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. गेल्या अनेक वर्षापासून ही संघटना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाबरोबरच आरोग्य शिबिर ठेवून मोफत तपासणी केली जाते.