नागपूर शहर: नोकरीचे आमिष दाखवून तरुणीचा विनयभंग, कार शोरूम मालकाविरुद्ध गुन्हा दाखल : अतुल तवाडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
गणेश पेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल तवाडे यांनी 4 एप्रिल ला दुपारी 05:30 ने दिलेल्या माहितीनुसार, नोकरीचे आमिष दाखवून तरुणीचा विनयभंग करणाऱ्या कार शोरूम मालकाविरुद्ध गणेश पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने पीडीतेला नोकरी बद्दल बोलण्यासाठी एका हॉटेलमध्ये बोलविले आणि तेथील रूम मध्ये नेऊन तिच्याशी अश्लील चाळे केले. याबद्दलची सविस्तर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल तवाडे यांनी दिली आहे.