पाथरी येथे बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ याची जीभ घसरली त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल अपशब्द वापरल्याबद्दल भारतीय जनता पार्टी सेलू यांच्या वतीने सपकाळ यांच्या गाडीला काळे झेंडे दाखवून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. गल्लीपासून दिल्लीपर्यंत काँग्रेसला नाकारल्यामुळे नैराश्यातून सपकाळांकडून मुख्यमंत्र्यांबाबत अपशब्द वापरली अशी टीका पालकमंत्री बोर्डीकर यांनी केली.