तुमसर तालुक्यातील उमरवाडा येथे काही आरोपी जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती तुमसर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर तुमसर पोलिसांनी त्वरित कारवाई केली. दिनांक २४ ऑक्टोंबर रोजी पोलिसांनी उमरवाडा येथील जुगार अड्ड्यावर धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईदरम्यान, ५ आरोपी अवैधरित्या जुगार खेळताना रंगेहाथ पकडले गेले. तुमसर पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून रोख रक्कम, ४ मोबाईल फोन आणि जुगार खेळण्याचे विविध साहित्य असा एकूण ४५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.