पिंपरी-चिंचवडमधील लिंक रोड, चिंचवड येथे काल रात्री धक्कादायक घटना उघडकीस आली. टाईल्स दुकानाचा मॅनेजर दुकान बंद करून घरी जात असताना तीन जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने वार करून त्याच्याकडील ३ लाख ८० हजार रुपयांची रोकड लुटून नेली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.