एरंडोल: मालखेडा गावाच्या शेतशिवारातून तीन शेतकऱ्यांच्या शेतातून ३२ हजार ५०० रुपयाच्या कापूस चोरी, कासोदा पोलीसात गुन्हा दाखल
एरंडोल तालुक्यात मालखेडा हे गाव आहे या गावाच्या शेतशिवारात राजेंद्र पाटील यांचे शेत गट क्रमांक १०५/२ , प्रभाकर पाटील यांचे शेत गट क्रमांक ८४/२ व भूषण पाटील यांचे शेत गट क्रमांक ८९/१ या शेतातून अज्ञात चोरट्याने तब्बल ३२ हजार ५०० रुपयाचे कापूस चोरी केले विशेष म्हणजे शेतातून कापूस वेचणी करून चोरी करण्यात आले आहे.तेव्हा याप्रकरणी कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे