तुमसर नगर परिषदेचे नगराध्यक्ष इंजि. सागर गभने यांनी आज दि.१७ जानेवारी रोज शनिवारला सकाळी १० वाजता राजेंद्र वार्ड येथे प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान त्यांनी वार्डातील कचरा व्यवस्थापन आणि नाली साफसफाईच्या कामाची बारकाईने तपासणी करत स्वच्छतेबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. यावेळी स्थानिक नागरिकांनी नगराध्यक्षांची भेट घेऊन आपल्या भागातील विविध नागरी समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्याची ग्वाही दिली.