नागपूर शहर: नियमबाह्य हॉस्पिटलवर मनपाची कारवाई; अग्निशमन सभापतींनी दिले कडक आदेश
मनपा अग्निशमन सभापती सौ. रुपाली परशू ठाकूर यांनी आज दिघोरी येथील 'नंदनवार हॉस्पिटल'ची अचानक पाहणी केली. या तपासणीत हॉस्पिटलने अग्निशमन विभागाची कोणतीही परवानगी (नाहरकत प्रमाणपत्र) घेतली नसल्याचे उघड झाले. या हॉस्पिटलवर यापूर्वीही कलम ६ आणि ८/१ अंतर्गत कारवाई होऊन नोटीस देण्यात आली होती, तरीही नियमांचे उल्लंघन सुरूच होते. याची गंभीर दखल घेत, सभापती सौ. ठाकूर यांनी तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.