युनिट-५ गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी खोपोली (रायगड) येथील नगरसेविका यांचे पती मंगेश काळोखे यांच्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी अरबाज ऊर्फ अरमान अल्लुद्दीन शेख (वय २६, रा.आदर्शनगर, उरळी देवाची, पुणे) याला अटक केली आहे. दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी काळेपडळ पोलीस स्टेशनकडील गंभीर दुखापतीच्या गुन्ह्यात तो पाहिजे आरोपी होता.