शहापूर: शहापूर येथे मासिक पाळीच्या संशयावरून मुलींना विवस्त्र करून मारहाण, पालकांच्या आक्रमकतेनंतर प्राचार्यावर गुन्हा दाखल
Shahapur, Thane | Jul 10, 2025 शहापूरच्या एका शाळेमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. टॉयलेट मध्ये रक्ताचे डाग आढळल्यामुळे मासिक पाळीच्या संशयावरून शाळेतील इयत्ता सहावी ते दहावी दरम्यानच्या सव्वाशे विद्यार्थिनींची कपडे काढून तपासणी केली. त्यानंतर मुलींनी रडत जाऊन आपल्या पालकांना हा प्रकार सांगितला आणि पालक संतप्त झाले. शाळेला घेराव घालून जाब विचारला आणि प्राचार्याला अटक करण्याची मागणी केली. पालकांचा रुद्र अवतार पाहून पोलिसांनी प्राचार्य सह आठ जणाविरुद्ध गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली असल्याची माहिती मिळत आहे.