अमरावती: माजी लेडी गव्हर्नर डॉ.कमलताई गवई यांना डी.लीट.पदवी घोषित कुलगुरू डॉ.मिलींद बारहाते यांचे हस्ते सत्कार
आज १२ नोव्हेंबर बुधवार रोजी सायंकाळी ५ वाजुन ९ मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्यावतीने माजी लेडी गव्हर्नर डॉ. कमलताई रामकृष्ण गवई यांना नुकतीच डी.लीट. ही सर्वोच्च पदवी घोषित करण्यात आली आहे. डॉ. कमलताई गवई यांनी मानवविज्ञान विद्याशाखेतील राज्यशास्त्र विषयात ‘विपश्यना एक चिकित्सक अभ्यास’ यावर संशोधन केले आहे. या उपलब्धीबद्दल कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी डॉ. कमलताई गवई यांच्या निवासस्थानी जावून त्यांचा विद्यापीठाच्यावतीने सत्कार केला.