नागपूर शहर: नागपुरात अमली पदार्थविरोधी कारवाई: दोघांना अटक, डोडा जप्त : भरत कऱ्हाडे, पोलीस निरीक्षक
गुन्हे शाखा युनिट सहा चे पोलीस निरीक्षक भरत कऱ्हाडे यांनी तीन जूनला दुपारी चार वाजता दिलेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट-६ च्या पथकाने अमली पदार्थ विक्री करणाऱ्या यश वालदे आणि चंदन साखरे या दोघांना अटक केली आहे. कपिल नगर परिसरात सुरू असलेल्या या अवैध धंद्यावर धाड टाकून पोलिसांनी २४९ ग्रॅम डोडा पावडर, एक मोबाईल आणि दुचाकी असा एकूण ७३,७५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास कपिल नगर पोलिसांकडे सोपवण्यात आला आहे. याबद्दलची अधिक माह