कल्याण: मराठी आलं नाही तर काय फरक पडतो,असे म्हणत अमराठी महिला कर्मचाऱ्यांची आरेरावी, कल्याणात मराठी अमराठी भाषिकांमध्ये वाद
Kalyan, Thane | Sep 15, 2025 मागील काय महिन्यांपासून महाराष्ट्रामध्ये मराठी आणि मराठी भाषिकांमध्ये अनेक वेळा वाद झालेले पाहायला मिळाले. काही दिवसांपासून याप्रकरणी वातावरण शांत असताना पुन्हा कल्याण परिसरामध्ये मराठी आणि अमराठी भाषिकांचा वाद झालेला पाहायला मिळाला. एका शॉप मध्ये मराठी व्यक्ती खरेदी करण्यासाठी गेले असता महिला कर्मचाऱ्यांना मराठी येत नाही का असे विचारले असता काय फरक पडतो मराठी आलं नाही तर असे म्हणत महिला कर्मचाऱ्यांनी अरेरावी केली. याप्रकरणी मराठी व्यक्तीने नाराजी व्यक्त करत निषेध केला.