नाशिक: माजी नगरसेवक उद्धव निमसे यांना जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशाने 20 सप्टेंबर पर्यंत पोलीस कस्टडी
Nashik, Nashik | Sep 16, 2025 नांदूर नाका येथील निमसे व धोत्रे गटात झालेल्या हाणामारीत राहुल धोत्रे याचा खून करण्यात आला होता त्यानंतर माजी नगरसेवक उद्धवजी यांच्यासह 11 जणांवर आडगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार असलेले उद्धव निमसे हे गुंडाविरोधी पथकाकडे स्वतःहून हजर झाले.जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 20 सप्टेंबर पर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. उद्धव निमसे यांनी हायकोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दिला होता परंतु न्यायालयाने तो फेटाळला.